14 मे पासून तेजबहादूर करणार जंतर-मंतरवर उपोषण

14 मे पासून तेजबहादूर करणार जंतर-मंतरवर उपोषण

भारतीय लष्करातील भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठवणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी जवान तेजबहादूर यादव यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. येत्या 14 मे पासून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर तेजबहादूर उपोषण करणार आहेत.

यादव यांनी सीमेवरील जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविले जाते; अशी तक्रार केली होती. सोशल मीडियावरून एक व्हिडिओ प्रसिद्ध करून त्यांनी थेट लष्करी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले होते. त्या व्हिडीओत तेजबहादूर यांनी लष्करात कशारीतीने जवानांची कुचंबना केली जाते याविषयीची व्यथा मंडळी होती. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. तेजबहादूर यांचे आरोप गैर असून व्हिडीओद्वारे असे लष्करा बद्दल पसरवणे म्हणजे देशविघातक कृत्य असल्याचे बोलले जात होते.

या घटनेनंतर बीएसएफची प्रतिमा मलीन केल्याच्या आरोपवरून गेल्याच महिन्यात तेजबहादूर यादव यांना बडतर्फ करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर तेजबहादूर यादव यांनी आता देशव्यापी आंदोलन करायचे ठरवले आहे. मुंबईत शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात तेजबहादूर यादव आले असता त्यांनी ही मी जंतर-मंतरवर उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

COMMENTS