खा. अशोक चव्हाण यात्रेच्या पूर्वतयारीसाठी प्रमुख नेत्यांची बैठक.
कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार.
विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा 15 एप्रिलपासून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून सुरु होणार आहे. या यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची बैठक विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.सुनिल तटकरे, माजी मंत्री आ. जयंत पाटील, आ. राहुल बोंद्रे, आ.हर्षवर्धन सपकाळ, आ. कुणाल पाटील, आ. निर्मला गावित, आ. पांडूरंग बरोरा, आ.नरहरी झिरवळ संघर्ष यात्रेचे समन्वयक आ. जितेंद्र आव्हाड आणि आ. सुनिल केदार यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लीकन पक्ष या सर्व विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते.
दुस-या टप्प्यात संघर्ष यात्रा बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, आणि पालघर जिल्ह्यातून जाणार आहे. या बैठकीत यात्रेच्या तयारीसंदर्भात आढावा घेण्यात आला. कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असून लवकरच यात्रेच्या दुस-या टप्प्याचा कार्यक्रम जाहीर केला जाईल अशी माहिती खा. अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
COMMENTS