चाळीसगांव- विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री महोदय, सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतोय की, खरंच पारदर्शी असाल तर सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा, असे थेट आव्हान धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आहे. सरकारमधील ते सोळा भ्रष्ट मंत्री कोण आहेत याबाबत धनंजय मुंडे खुलासा करणार का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या निमीत्ताने मुंडे आज जळगावात आहे त्यांनिमीत्त ते बोलत होते.
‘गली-गली मे शोर है, चौकीदार ही चोर है’ चाळीसगावच्या सभेचा हा एकच सूर होता. मुख्यमंत्री महोदय, सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतोय की, खरंच पारदर्शी असाल तर सोळा भ्रष्ट मंत्र्यांना घरी बसवा.#परिवर्तनयात्रा #निर्धार_परिवर्तनाचा #परिवर्तनपर्व #चाळीसगाव pic.twitter.com/rUR5Qm7H9A
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 18, 2019
दरम्यान धनंजय मुंडे यांनी ट्वीट केलं असून गली-गली मे शोर है, चौकीदार ही चोर है’ असं यामध्ये म्हटलं आहे. चाळीसगावात सभेला जमलेल्या शेतकऱ्यांपैकी फक्त दोघांची कर्जमाफी झाल्याचा पुरावा मिळाला. बाकी सर्व शेतकऱ्यांचे हात अजूनही कर्जमाफीच्या प्रतिक्षेत आहे. सभेसाठी जमलेली गर्दी हा अवघ्या महाराष्ट्राचे वातावरण राष्ट्रवादीमय झाल्याचा पुरावा असल्याचंही यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS