छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजना उद्यपासुन सुरु होणार आहे. कर्जमाफीचा पहिला हप्ता 18 तारखेपासून शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 18 तारखेला कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होणार आहे.
शेतकरी कर्जमाफीला उद्यापासून प्रत्यक्षात सुरुवात होणार असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, पहिल्या टप्प्यात ज्यांच्या खात्यावर समस्या नाही अशा 75 % शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होईल उर्वरित शेतकऱ्यांची कर्जमाफी ऑक्टोबर महिन्याच्या आत केली जाणार आहे. शेती दुसरीकडे असेल आणि मुंबईत जर कर्ज घेतलं असेल तर अशा शेतकर्यांना कर्जमाफी मिळणार आहे. मुंबईतल्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची पूर्ण चौकशी होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
COMMENTS