साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी ठरवण्यात आलेला मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती समोर आहे. छातीत दुखत असल्यामुळे मंगळवारी रात्री उशीरा त्याला जे.जे. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. अतितणाव आणि छातीतील संसर्गामुळे डोसाला हा त्रास होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं मुस्तफा डोसाचा मृत्यू झाल्याची माहिती दुपारी समोर आली.
1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरविण्यात आलेले मुस्तफा डोसा व फिरोज खान यांना याच प्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मंगळवारी सीबीआयने विशेष टाडा न्यायालयाला केली होती. या बॉम्बस्फोटात या दोघांची भूमिका मेमनप्रमाणे महत्त्वाची आहे, असा युक्तिवाद सीबीआयने केला.
Mustafa Dossa died due to cardiac arrest today at 2.30 pm: TP Lahane, JJ Hospital Dean
— ANI (@ANI_news) June 28, 2017
COMMENTS