2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नवा चेहरा समोर करण्याच्या विचारात आहे. राहुल गांधी यांच्याशिवाय दुस-या नेत्याच्या नेतृत्वाखाली निवडणुक लढवण्याचा काँग्रेसचा विचार असल्याचं वृत्त टीव्ही 18 नं सूत्रांच्या हवाल्यानं दिलंय. 2014 निवडणुकीतील पराभव आणि त्यानंतर विविध विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला आलेलं अपयश पाहता काँग्रेस आता जुन्या जाणत्या नेत्यांसह मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसात काँगेसचे जुने नेते अधिकच सक्रीय झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेमध्येही राहुल गांधी फारसे सक्रीय नव्हते. उलट सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन मीराकुमार यांचं नावं जाहीर केलं होतं. त्यामुळे राहु गांधी यांना डावलून इतर नेत्यांना 2019 मध्ये पुढं केलं जाऊ शकतं असं काँग्रेसमधील काही विश्वसनिय सुत्रांनी टीव्ही 18 ला सांगितल्याचं वृत्त आहे.
2019 मध्येही मोदी विरुद्ध राहुल असा सामना झाला किंवा प्रचार झाला तर मोदींच्या पुढे राहुल गांधी हे खूपच कमकूवत ठरु शकतात याची भीती काँग्रेसला आहे. तसंच विरोधकांची मोट बांधायची म्हटलं तरी राहुल गांधी यांना मर्यादा पडतात. लालू प्रसाद यादव, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांसोबत राहुल यांचे संबंध फारसे चांगले नाहीत. एकूण विरोधकांची मोट बांधण्यात राहुल यांना फारसं यश आलेलं नाही. त्यामुळेही 2019 मध्ये त्यांचं नाव मागे पडण्याची शक्यता आहे.
COMMENTS