2019 च्या लोकसभेसाठी भाजप – शिवसेना यांच्यात युती ?

2019 च्या लोकसभेसाठी भाजप – शिवसेना यांच्यात युती ?

मुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बुधवारी रात्री झालेली मॅराथॉन बैठक सकारात्मक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी युती करुन लढविण्यास शिवसेना राजी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्यात काही प्रमाणात का होईना अमित शहा यांना यश आल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

मात्र बुधवारच्या बैठकीसारख्या आणखी दोन ते तीन बैठका झाल्यानंतर याबाबतर सविस्तर चर्चा होईल आणि त्यानंतरच युतीबाबत अधिकृत शिक्कामोर्तब होईल असंही सांगण्यात येतंय. नेत्यांचा दुरावा कमी झाला असला तरी कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये झालेला दुरावा कसा दूर होणार हाही दोन्ही पक्षांसमोरील प्रश्न असेल. तसंच सत्तेत आल्यापासून शिवसेना सरकारच्या कामकाजावर चौफेर हल्लाबोल करत आली आहे. आता मतदारांसमोर जाताना शिवेसनेची अडचण होणार आहे.

दरम्यान पुढच्या महिन्यात होणा-या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला आणखी एखादे चांगले मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. आता विधान परिषदेच्या चार जांगासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांसमोर शड्डू ठोकल्यानंतर त्यात बदल होतो का ते पहावं लागेल.

COMMENTS