सरकारनं तूर खरेदी केंद्र बंद केल्यानं राज्यातील शेतकरी अडचणीत आले. यातच येत्या 24 तासात तूर खरेदी केंद्र सरकारने सुरु करावीत अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला दिला. तसेच सरकारने अगोदर जाहीर केलेल्या हमीभावाने शेतकरी घेऊन आलेले तूर खरेदी करावे असं ही राज ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणालेत,’ शेतकऱ्यांची सरकार फसवणूक करत आहे आणि लाखो क्विंटल तूर प्रत्येक खरेदी केंद्रावर शिल्लक असतानाही ही खरेदी केंद्र बंद केली जात आहेत. सरकारच्या भरवशावर आज हा शेतकरी घरदार सोडून तिथे आला आहे आणि त्याला फसवलं जात आहे.”, असा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे.
COMMENTS