दिल्ली – सीबीआय कोर्टाच्या विशेष न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. माजी दूरसंचारमंत्री ए राजा आणि डीएमकेच्या नेत्या कनिमोळी यांच्यासह या घोटाळ्याप्रकरणी आरोप असेलेले सर्व 19 आरोपींची न्यायालयाने दोषमुक्त ठरवलेले आहेत. त्यामुळे डीएमकेसह काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात 1 कोटी 76 लाख कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप होता. कॅगने तसा निष्कर्ष काढला होता.
टू जी घोटाळा प्रकरणी भाजपने काँग्रेस आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावरवर गंभीर आरोप केले होते. 2014 च्या निवडणुकीपूर्वी या आरोपांमुळे काँग्रेसची आणि मनममोहनसिंह यांची प्रतिमा डागाळली होती. त्याचा मोठा फटका काँग्रेसला 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बसला होता. २०११ मध्ये या घोटाळ्याची दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु झाली. या प्रकरणात न्यायालयाने ए राजा, कनिमोळी यांच्यासह १७ जणांवर आरोप निश्चित केले होते. गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, सरकारी पदाचा गैरवापर करणे, लाच घेणे अशा विविध कलमांखाली त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले होते.
#WATCH: Former PM Manmohan Singh says, 'the court judgement has to be respected. I'm glad that the court has pronounced that the massive propaganda against UPA was without any foundation.' #2GScamVerdict pic.twitter.com/9WAhwjekph
— ANI (@ANI) December 21, 2017
COMMENTS