संपूर्ण देशाला एकाच कराच्या जाळ्यात आणणाऱ्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्याच्या अंमलबजावणीची सुरुवात वाजत-गाजत होणार आहे. येत्या 1 जुलैपासून देशभर जीएसटी लागू होणार आहे. त्या निमित्ताने 30 जूनच्या रात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जीएसटीची औपचारिक घोषणा करणार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत आज ही माहिती दिली. 30 जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटी लागू करण्यास सर्व राज्यांनी मान्यता दिली आहे. केरळ व काश्मीर वगळता सर्व राज्यांत 1 जुलैपासून जीएसटी लागू होईल. केरळ विधानसभेत पुढील आठवड्यात जीएसटी कायदा मंजूर केला जाणार आहे. काश्मीरमध्येही त्या दिशेने काम सुरू असल्याचे जेटलींनी सांगितले.
या सोहळ्यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षांचे नेते उपस्थित असणार आहेत.
COMMENTS