मुंबई – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागणीला यश आलं आहे. मुंबईत 31 डिसेंबरच्या रात्री पब, बार आणि हॉटेल्स सुरु राहणार आहेत. याबाबत सरकानं परवानगी दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नववर्षनिमित्त बाजारपेठा २४ तास सुरू ठेवण्याची मागणी केली होती. यामध्ये त्यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे या शहरांच्या अनिवासी भागातील बाजारपेठा २४ तास सुरू ठेवण्याची मागणी केली होती.त्यानंतर सरकारनं ही परवानगी दिली आहे.
My letter to @CMOMaharashtra about 31st December and Mumbai 24×7 proposal pending for a few months. pic.twitter.com/uWqGVKWW5q
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 26, 2018
तसेच या दिवशी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मुंबईत तब्बल 40 हजार पोलिसांचा पहारा असणार आहे. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पोलीस साध्या वेषात वावरणार आहेत.तसेच यासोबत लाईव्ह कॅमेरानेही पोलीस मुंबईवर लक्ष ठेवणार असल्याची माहिती आहे.
COMMENTS