चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिका निवडणुकींच्या मतदानाला सुरूवात

चंद्रपूर, परभणी आणि लातूर महानगरपालिका निवडणुकींच्या मतदानाला सुरूवात

चंद्रपूर, लातूर, आणि परभणी महापालिकांच्या निवडणूकांसाठी आज सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरूवात झाली. लातूर महानगरपालिकेसाठी दुपारी 1.30 वाजेपर्यंत 34 टक्के मतदान झाले आहे. चंद्रपूरात 29.2 टक्के  तर, परभणीत 37.31 टक्के मतदान झाले आहे.  सध्या दिवसाच्या तापमानात फार मोठी वाढ झाली असून या प्रखर उन्हात मतदार आपल्या घराच्या बाहेर पडू शकत नसल्याने मतदानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने या सर्व बाबी विचारात घेऊन निवडणूकीच्या मतदानाची वेळ वाढवण्यात आली असून सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. या तीन जिल्ह्यात होणाऱ्या मतदानाचा निकाल 21 एप्रिल रोजी लागणार आहे.

 

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचे वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी आज ‘सर्वप्रथम मतदान’ केले. चंद्रपूर शहरात एकूण 3 लाख 460 मतदार आहेत. हे मतदार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 460 उमेदवारांचे भवितव्य आज मतदानाद्वारे ठरविणार आहेत. दरम्यान राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांसह केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचे मुळ गाव चंद्रपूर आहे. यामुळे मातब्बर नेत्यांच्या शहरातील ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. चुरशीच्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

COMMENTS