6 जुलैपासून देशव्यापी शेतकरी जागृती यात्रा, देशातील 22 संघटना होणार सहभागी –राजू शेट्टी

6 जुलैपासून देशव्यापी शेतकरी जागृती यात्रा, देशातील 22 संघटना होणार सहभागी –राजू शेट्टी

दिल्ली – विविध राज्यात सुरु असलेलं शेतकरी आंदोलन आता राष्ट्रीय पातळीवर केलं जाणार आहे. शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अमलात आणाव्यात यासाठी आता राष्ट्रीय पातळीवर शेतकरी जनजागृती यात्रा काढण्यात येणार आहे. येत्या 6 जुलैपासून मध्यप्रदेशातील मंदसौर येथून या यात्रेला सुरूवात होणार असून 2 ऑक्टोबरला बिहारमधील चंपारणमध्ये या यात्रेचा समारोप होईल. दिल्लीत आज देशभरातील शेतकरी प्रतिनिधींची बैठक झाली. त्यानंतर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली. आंदोलनाच्या दुस-या टप्प्यात त्याचे स्वरुप उग्र केले जाईल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. राजकीय पक्षाचा झेंडा न आणता कोणीही या यात्रेमध्ये सहभागी होऊ शकेल असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं. या बैठकीला  १२ राज्यांतील 22 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये  महाराष्ट्र,  उत्तराखंड,  हरियाणा,  पंजाब,  राजस्थान,  उत्तर प्रदेश,  बिहार, तेलंगाना,  आंध्र प्रदेश,  दिल्ली,  मध्य प्रदेश,  पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे.

COMMENTS