डाओस – डाओसमध्ये भारताचे पंतप्रधान नेरंद्र मोदी यांचे काल भाषण झाले. या भाषणात बोलताना त्यांनी एक गंभीर चूक केली. 2014 मध्ये भारतात 600 कोटी मतदारांनी भाजपच्या सरकारला बहुमताने निवडूण दिले असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. देशाची लोकसंख्या 125 कोटी असताना आणि त्याचा उल्लेख पंतप्रधान त्यांच्या भाषणातून वारंवार करत असताना मोदींकडून अशी चूक कशी झाली याबाबत राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पंतप्रधानांचं भाषण सुरू असतानाच ते पीएमओच्या ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट केलं जात होतं. पंतप्रधांनी 600 कोटी मतदारांचा उल्लेख केल्यानंतर त्यांचं वाक्य जसंच्यातसं ट्विट करण्यात आलं. पंतप्रधानांकडू चूक झाली हे कोण्याचीही लक्षात आलं नाही. त्यामुळे ते बराच वेळ तसंच होतं. मात्र सोशल मीडियावरुन त्यांची टिंगल टवाळी सुरू झाल्यानंतर काही वेळानी ते ट्विट डिलीट करण्यात आलं. मात्र तोपर्यंत ते जवळपास 100 जणांनी ते रिट्विट केलं होतं. तसंच त्याचे फोटोही काढून सोशल मीडियावर व्हायरल केले गेले.
COMMENTS