65 लाख पुस्तके होणार मोबाइलवर उपलब्ध…

65 लाख पुस्तके होणार मोबाइलवर उपलब्ध…

आजचे युग हे मोबाइल आणि टॅबचे आहे. नव्या पिढीला परंपरागत पुस्तकांपेक्षा हीच माध्यमे आता जवळची वाटू लागली आहेत. त्यामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नव्या पिढीच्या हातात हात घालून शिक्षणाचे धोरण ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. या मंत्रालयातर्फे राष्ट्रीय डिजिटल वाचनालयाची (नॅशनल डिजिटल लायब्ररी) मूहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. या वाचनालयाचे मोबाइल अॅप तयार करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या स्मार्टफोनवर तब्बल 65 लाख पुस्तकांची पाने खुली होणार आहेत. बाजारात स्मार्टफोनचा वाढत असलेला खप बघून राष्ट्रीय डिजिटल वाचनालयाचे हे पाऊल उचलण्यात आले आहे. देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध पुस्तके या अॅपद्वारे मोबाइलवर वाचता येणार आहेत. जागतिक स्तरावर प्रथमच हा प्रयोग करण्यात आला आहे.

COMMENTS