श्रीनगर या एका लोकसभा मतदारसंघात आणि इतर 7 राज्यातील 10 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू झालं आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू असून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. मतदानाच्या पार्श्वभूमीवर श्रीनरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राज्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. या मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्लांसहित नऊ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पीडीपीचे नेते तारिक हमीद कारा यांनी राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त होती. श्रीनगर लोकसभा मतदारसघांच्या शिवाय 7 राज्यातील 10 विधानसभा मतदारसंघातही मतदान होत आहे. ते मतदारसंघ खालील प्रमाणे….
अटेर आणि बांधवगड (मध्य प्रदेश)
भोरंज (हिमाचल प्रदेश)
धेमई (आसाम)
नांजनागुड (कर्नाटक)
राजौरी गार्डन (दिल्ली)
लिटिपारा (झारखंड)
धौलपूर (राजस्थान)
कंठी दक्षिण (प. बंगाल)
COMMENTS