संपूर्ण कर्जमाफीसाठी उपोषणाला बसलेल्या महिलेवर पुणतांब्यात अज्ञातांचा हल्ला !

संपूर्ण कर्जमाफीसाठी उपोषणाला बसलेल्या महिलेवर पुणतांब्यात अज्ञातांचा हल्ला !

पुणतांबे – शेतकरी संपूर्ण कर्जमाफीसाठी पुणतांबे इथं बेमुदत उपोषणाला बसलेल्या सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांच्यावर रात्री एका अज्ञात इसमाने हल्ला केला. इनामदार या बाथरुमसाठी जात असताना एक अज्ञात व्यक्ती तिथे आली आणि तिने इनामदार यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेला झटापटीत इनामदार यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्या कपाळावर मोठे टेंगुळ आले आहे. सरकारने भाडोत्री गुंड आणून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप इनामदार यांनी केला आहे. इनामदार यांच्या उपोषणाचा काल सातवा दिवस होता.

COMMENTS