नितीशकुमारांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

नितीशकुमारांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. त्यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. नितीश कुमार यांच्या बाजूने 131 आमदारांनी मतदान केले, तर 110 आमदारांनी विरोधात मतदान केले. 

नितीशकुमार यांनी आज (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव सादर केला होता. मात्र, यावेळी सभागृहात राजदच्या आमदारांनी प्रचंड गदारोळ केला होता. लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यादव यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली आहे.

बिहारच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनंतर नितीशकुमार यांनी महाआघाडीतून बाहेर पडत मुख्यममंत्रिपदाचा राजीनामा दिला. आणि काल (गुरुवार) पुन्हा त्यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज त्यांनी विश्वासदर्शक ठराव मांडत तो 131 मतांनी जिंकला. तेजस्वी यादव यांच्यासह राजदच्या आमदारांनी बिहार विधानभवनाबाहेर नितीश कुमार यांच्या विश्वासदर्शक ठरावापूर्वी जोरदार निषेध केला.

दरम्यान, संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजप यांच्या सरकार स्थापनेविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. मात्र, या याचिकेवर 31 जुलैपूर्वी सुनावणी अशक्य असल्याचे पाटणा उच्च न्यायालय म्हटले आहे.

 

 

 

COMMENTS