नितीश कुमार यांच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार !

नितीश कुमार यांच्या मंत्रीमंडळाचा आज विस्तार !

बिहारमध्ये 131 आमदारांच्या पाठींब्यानंतर जेडीयू-भाजपच्या संयुक्त सरकारवर शुक्रवारी (दि.28) शिक्कामोर्तब झाला. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष मंत्रीमंडळाच्या  विस्ताराकडे लागून आहे. आज 5 वाजता राजभवनात होणाऱ्या विस्तार कार्यक्रमात 35 आमदारांकडून  कॅबिनेट पदाची शपथ घेतली जाणार आहे.

नव्या कैबिनेटमध्ये 35 आमदारांचा समावेश आहे. यामध्ये एनडीएचे 16 आमदार आणि जेडीयुच्या 19 आमदारांना बिहारचे राज्यापाल केशरी नाथ त्रिपाठी शपथ देतील.  यानिमित्त राजभवनातील सुरक्षा वाढवण्यात आली असून 150 जवान तैनात करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री सुशील मोदी, बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय तसेच इतर नेते मुख्यमंत्री आवासामध्ये पोहोचले आहेत.

जेडीयूचे शपथ घेणारे संभाव्य आमदार – ललन सिंह, सुरेश शर्मा, विनोद सिंह, नीरज कुमार,  श्रवण कुमार, बिजेन्द्र यादव, खुर्शीद आलम

बीजेपीचे शपथ घेणारे संभाव्य आमदार – नंद किशोर यादव, रामनारायण मंडल, प्रेम कुमार, मंगल पांडे, अरुण सिन्हा, नितिन नवीन, नीरज बबलू, अनिल सिंह, रजणिश सिंह

 

 

COMMENTS