2 मंत्री, राज्यपाल आणि कुलगुरू राजीनामा द्या –  सचिन सावंत

2 मंत्री, राज्यपाल आणि कुलगुरू राजीनामा द्या – सचिन सावंत

मुंबई – ‘पदासाठी पात्र नसतानाही ज्या तर्हेने पात्रता डावलूव संजय देशमुख यांची निवड झाली आहे. त्यामुऴे मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभार समोर आला आहे. याला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, शिक्षण मंत्री विनोद तावडे व राज्यपाल जबाबदार असून त्यांनी राजीनामा द्यावा’. अशी मागणी कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

‘मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू पदासाठी 15-20 उमेदवार होते. मात्र संघ परिवशी संबंध आहे म्हणून देशमुख यांची नेमणूक करण्यात आली. राज्यपालांनी यांची हकालपट्टी केली पाहिजे. शाखा चालवण्यासारखे विद्यापीठ चालवत असतील तर ते निषेधार्ह आहे. यांची नियुक्ती राज्यपालांनी केली त्यांनी पण राजीनामा द्यावा.  तसेच यासर्वाला शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जबाबदारी घ्यावी आणि पायउतार व्हावे’. अशी मागणी सचिन सावंत यांनी केली .

 

 

 

 

COMMENTS