अमित शहांची संपत्ती 5 वर्षांत 300 % वाढली !

अमित शहांची संपत्ती 5 वर्षांत 300 % वाढली !

अहमदाबाद –  भाजपध्यक्ष अमित शहा यांच्या संपत्तीत तब्बल 300 टक्क्यांची वाढ झाली आहे. अमित शहा यांच्या संपत्तीत झालेली ही वाढ पाठीमागील केवळ 5 वर्षांमधली आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले आणि अमित शहा राष्ट्रीय राजकारणात चर्चेला आले. आकड्यांमध्येच सांगयचे तर गेल्या 5 वर्षांमध्ये शहांची संपत्ती  25 कोटी रूपयांनी वाढली आहे.

राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात गुजरातमधून राज्यसभेसाठी अमित शहा, स्मृती इराणी, बलवंतसिंह राजपूत आणि काँग्रेसचे अहमद पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी दाखल केला. या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञपत्रात सर्वच उमेदवारांनी आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला. यात ही माहिती पूढे आली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार शहा दाम्पत्याकडे 2012 मध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून 8 कोटी 54 लाख रुपयांची संपत्ती होती. जी 2017 मध्ये 34 कोटी 31 लाखांवर पोहोचली आहे. एकूण संपत्तीमध्ये जंगल मालमत्ता 1 कोटी 91 लाख रुपयांवरुन 19 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. शहा दाम्पत्याच्या मालमत्तेमध्ये 300 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरुन पूढे येत आहे. शहा यांनी वार्षी उत्पन्नापोटी 1 कोटी 49 लाख रूपयांची मिळकत दाखवली आहे.  दरम्यान, फेब्रुवारी 2013 मध्ये मातोश्रींच्या निधनानंतर अमित शहा यांच्या संपत्तीमध्ये वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीचाही समावेश झाला. म्हणूनच ही वाढ दिसते असे सूत्रांचे म्हणणे आहे.

 

 

COMMENTS