मुंबई – बेस्ट कर्मचाऱ्यांनी येत्या 6 ऑगस्टपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा संप बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी पुकारण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेले उपोषण काल गुरुवारी मागे घेण्यात आले, पण त्याऐवजी संपाचा इशारा बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
बेस्टच्या कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून वेळेत पगार दिला जात नाही. गेल्या चार दिवसांपासून वेतनासंदर्भातील मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृति समितीचे उपोषण सुरु होते. काल दुपारी झालेल्या सभेत कामगारांच्या इच्छेप्रमाणे उपोषण मागे घेत संपाची हाक देण्यात आली. आपल्या वेतनविषयक मागण्या 6 ऑगस्टपर्यंत मान्य न झाल्यास त्याच रात्रीपासून बेस्ट बंद करुन संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
COMMENTS