2016 ला झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत नगराध्यक्षा म्हणून निवडूण आलेल्या विणा सोनावणे यांचं नगराध्यक्ष पद रद्द करण्यात आलं आहे. त्यांनी निवडणूक लढवताना सादर केलेला जातीचा दाखला अवैध असल्याचं निष्पन्न झाल्यानं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानं ही कारवाई केली आहे.
विणा सोनावणे ह्या काॅंग्रेसच्या उमेदवार म्हणून थेट जनतेतून निवडून आल्या होत्या. मात्र त्यांच्या ओबीसी असल्याच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला. त्यानुसार जात पडताळणी समितीच्या अहवालावरून त्यांची निवड अवैध ठरवण्यात आली आहे.
COMMENTS