सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी !

सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी !

पुणे – सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. स्वाभिमानी संघटनेच्या चौकशी समितीने यासंबंधीचा आपला निर्णय आज जाहीर केला.

‘सदाभाऊंना मिळालेले मंत्रीपद स्वाभिमानीच्या कोट्यातील आहे. ते त्यांनी खाली करुन द्यावे. पक्षाच्या कार्यकारिणीत सदाभाऊंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. मुख्यमंत्र्यांना देखील सदाभाऊंना काढून टाकण्यास सांगणार आहे.’ असे चौकशी समितीचे अध्यक्ष  दशरथ सावंत यांनी म्हटले आहे.

मधल्या काळात स्वाभिमानी संघटना आणि याच संघटनेचे राज्यमंत्री असणारे सदाभाऊ खोत यांच्यात बेबनाव तयार झाला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी  करण्यासाठी संघटनेच्या वतीने एका चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर आज या समितीने आपला निर्णय जाहीर केला.

COMMENTS