उच्च न्यायालयाने दहिहंडीच्या थरांवरील निर्बंध हटवले

उच्च न्यायालयाने दहिहंडीच्या थरांवरील निर्बंध हटवले

राज्यातील सर्व गोविंदा पथकांसाठी आनंदाची बातमी आहे. दहिहंडीच्या थरांवरील निर्बंध उच्च न्यायालयाने  हटवले आहे. दहिहंडी साजरी करताना सरकारने सर्व नियमांची अंमलबजावणी करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

दहिहंडीचा निर्णय सरकारने विधीमंडळात घ्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. न्यायालयाने दहिहंडीच्या थरांवरील निर्बंध हटवले असले तरी 14 वर्षाच्या खालील मुले सहभागी होणार नाहीत, तसेच उंचीचा निर्णय सरकारने घ्यावा, असे स्पष्ट केले आहे.

दहीहंडीत आयोजकांना ध्वनी प्रदूषणाचे नियम लागू राहतील, मद्यपान करमाऱ्यांना प्रवेश नसेल, गोविंदाच्या सुरक्षे बाबतच्या साधनांची नोंद केली जाईल, मोबाईल, टॉयलेट बंधनकारक असतील. हेल्मेट,सेफ्टी बेल्ट,चेस्ट गार्ड देने बंधनकारक असतील, अशी माहिती राज्य सरकारने सुनावणीवेळी न्यायालयाला  दिली.

 

COMMENTS