इटानगर – राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्वेकडील राज्य अरुणाचल प्रदेशामध्ये मोठा धक्का बसला आहे. पक्षाची संपूर्ण प्रदेश कार्याकारणी नॅशनल पिपल्स पार्टीमध्ये विलिन झाली आहे. पक्षाच्या कोणत्याही राष्ट्रीय नेत्याला अरुणाचल प्रदेशात लक्ष देण्यास स्वारस्य नाही, आणि त्यामुळे आपण पक्ष सोडल्याचं स्थानिक नेत्यांनी सांगितलं आहे.
चीनकडून अरुणाचल प्रदेशावर दावा केला जात आहे. अशा वेळी लोकसभेमध्ये त्याविषयी पक्षाचे खासदार काहीच बोलत नाहीत. त्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावरील विश्वास आता संपला आहे. त्यामुळे आम्ही नवीन पर्याय निवडल्याचं पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितलं आहे. दिवंगत नेते पी ए संगमा यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर एनपीपीची स्थापन केली होती. त्यांचा मुलगा सध्या पक्षाचा अध्यक्ष आहे.
COMMENTS