मुंबई – उत्तर प्रदेशातील गोरखपूरच्या दुर्घटनेवरुन सामनाच्या अग्रलेखातून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. राज्य सरकारने विजबिलाचे पैस थकवले आणि त्यामुळे वीज कंपनीने हॉस्पिटलची वीज तोडली. त्यामुळे ऑक्सिजन अभावी 70 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात नसून सरकारकडून करण्यात आलेले सामूहिक हत्याकांड असल्याची घणाघाती टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
खरंतर गोरखपूर हा मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा जिल्हा. हा प्रकार हा सरकारला आणि माणुसकीला काळिमा असल्याची टीकाही सामनातून करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात इथे मुले मरतातच असे सागणा-यांना आमजा सवाल आहे, पटकीचा फेरा गरिबांच्या घरातच का शिरतो ? ही तर गरिबीची विटंबना असल्याचा घणाघातही सामनातून करण्यात आलाय.
COMMENTS