दिल्ली – स्वातंत्र्य दिनाच्या पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संभोधित केलं. पंतप्रधानांच्या यावेळच्या भाषणाचं वैशिष्य म्हणजे त्यांनी आजचे भाषण आटोपशीर केले. यापूर्वीच्या तुलनेत पंतप्रधांनी भाषणासाठी कमी वेळ घेतला. त्यांनी केवळ 57 मिनिटात भाषण संपवले. गेल्या तीन भाषणाच्या तुलनेत हे सर्वात कमी वेळेचे भाषण ठरले. गेल्या वर्षी पंतप्रधांनी तब्बल 96 मिनिटे भाषण केले होते. तर 2015 मध्ये 86 मिनिटे तर 2014 मध्ये 65 मिनिटांचं भाषणं केलं. मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधांनी यावेळी लाल किल्ल्यावर छोटे भाषण करु असं आश्वासन दिलं होतं.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या काळात फक्त एकदाच 50 मिनिटे भाषण केलं होतं. तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी एकवेळ सर्वात कमी म्हणजे फक्त 25 मिनिटे भाषण केलं होतं. वाजपेंची भाषणेही कधीच 30 ते 35 मिनिटांच्या पुढे नसायची.
COMMENTS