नवी दिल्ली – हरयाणातील पंचकुलामध्ये आज डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना बलात्कार आणि लैंगिक शोषण या दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. त्यानंतर डेरा सच्चा सौदाचे हजारो समर्थक आधीपासूनच पंचकुलामध्ये तळ ठोकून बसले होते. आज सीबीआय न्यायालयाने बाबा राम रहिम यांना दोषी ठरविल्यानंतर पंचकुलामध्ये हिंसाचार उसळला आहे. या हिंसाचारात 17 जण ठार झाले आहेत.तर 200हून जास्त लोक जखमी झाले आहेत. असे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वेबसाईटने दिले आहे.
डेरा सच्चाच्या प्रमुखांकडून चूक होऊच शकत नाही असा दावा आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला आता हिंसक वळण लागलं आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत डेरा सच्चाच्या 1 हजार अनुयायांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Police use water cannon on violent #DeraSachaSauda followers in vicinity of Panchkula's Spl CBI Court (Earlier Visuals) #RamRahimVerdict pic.twitter.com/bNLyZwNwTS
— ANI (@ANI) August 25, 2017
COMMENTS