भाजपच्या खासदाराचा बाबा रहीम यांना पाठिंबा !

भाजपच्या खासदाराचा बाबा रहीम यांना पाठिंबा !

बलात्काराच्या आरोपाखाली कोर्टाने दोषी ठरवलेल्या बाबा राम रहिम यांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे खासदार साक्षी महाराज पुढे आले आहेत. बाबा राम रहिम यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांच्या अनुयायांकडून पंजाब आणि हरियाणाममध्ये धुमाकूळ घातला असून त्यामध्ये आतापर्यंत 30 जणांचा जीव गेला आहे. असं असतानाही भाजपचे खासदार साक्षी महाराज यांना मात्र कोर्टाचा निर्णयच मान्य नाही. केवळ एक दोन व्यक्तीनीं तक्रार केल्यामुळे कोट्यवधी लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे दोषी ठरवणं चुकीचं असल्याचं  मतही त्यांनी दिलंय. इकॉनॉमिक टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राने आणि न्यूज 18, एनडीडीव्ही यांनी  हे वृत्त दिले आहे. सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट हे एकदोन व्यक्तींच्या तक्रारीवरुन कोट्यवधी लोकांच्या भावनेकडे दुर्लक्ष करतं असंही साक्षी महाराज म्हणाले. भारतीय संस्कृतीवर हा घाला असल्याचंही त्याचं म्हणणं आहे.

COMMENTS