गुजरात विधासभा निवडणुकीसाठी भाजपची नवी स्लोगन !

गुजरात विधासभा निवडणुकीसाठी भाजपची नवी स्लोगन !

नवी दिल्ली  –  विधानसभेच्या निवडणूक जिंकण्यासाठी गुजरातमध्ये भाजपने नवीन रणनीती आखली आहे भाजप येत्या 10 सप्टेंबरला ‘गरजे गुजरात’ हा नवा नारा लाँच करणार आहे.

भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता भाजपची नजर गुजरात विधानसभा निवडणुकीवर टिकून आहे. या वर्षाच्या शेवटी ही निवडणूक होणार असून 182 सदस्य असलेल्या या विधानसभेत भाजपने 150 जागा जिकंण्याचा लक्ष्य ठेवला आहे. एका मोहीमेतून एकाचवेळी 100 ठिकाणी ‘ गरजे गुजरात’ हा नारा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे लाँच करण्यात येणार आहे.

गेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता असून ही सत्ता कायम टिकवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे.

COMMENTS