मुंबईत काँग्रेसला धक्का, माजी आमदार भाजपात !

मुंबईत काँग्रेसला धक्का, माजी आमदार भाजपात !

मुंबई – काँग्रेसचे माजी आमदार आणि मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते राजहंस सिंह यांनी काँग्रेसला राम राम ठोकत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला आहे. आज मंत्रालयात पक्ष प्रवेश  केला. 2009 मध्ये ते  वर्सोवा मतदार संघातून निवडून आले होते.

राजहंस सिंग यांनी दिंडोशी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. मात्र या मतदार संघातून शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु यांचा विजय झाला होता. शिवसेनेच्या सुनील प्रभुंमुळे राजहंस सिंग यांना हार पत्करावी लागली होती. झालेल्या पराभवानंतर माजी आमदार राजहंस सिंग काँग्रेसवर नाराज असल्याचे बोलले जात आहे.

राजहंस सिंग यांनी  मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद भूषवले आहे. तसेच काँग्रेसकडून तीन वेळा नगरसेवक राहिले आहेत.  राजहंस सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकत वाढली असल्याच बोल जात आहे. या पक्ष प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.

 

 

COMMENTS