बेहिशेबी मालमत्तेवरुन 7 खासदार आणि 98 आमदारांची चौकशी सुरू !

बेहिशेबी मालमत्तेवरुन 7 खासदार आणि 98 आमदारांची चौकशी सुरू !

नवी दिल्ली – खासदार आणि आमदार झाल्यानंतर संपत्तीत भरमसाठ वाढ झाल्याचं आढळलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने आदेश देत यावर सविस्तर रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले होते. उत्पन्नाहून अधिक संपत्ती असल्यामुळे लोकसभेचे 7 खासदार आणि 98 आमदारांची चौकशी सुरू आहे, असेही केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड(सीबीडीटी)ने न्यायालयात स्पष्ट केलं आहे.
ज्या खासदार आणि आमदारांची उत्पन्नाहून अधिक संपत्ती आहे, त्यांची नावे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड सील बंद पाकिटात देणार आहे.  लोकसभेचे त्या 7 खासदारांसह 98 आमदारांच्या संपत्तीत चांगल्या प्रकारे वाढ नोंदवली गेली आहे. लोकसभेचे  खासदार, राज्यसभेचे खासदार आणि आमदार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रा पेक्षा अधिक  संपत्तीत असल्याचा आरोप लखनऊमधील एनजीओ लोक प्रहरीने केला होता. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने चौकशी सुरू केली. सद्यस्थितीत लोकसभेचे 9, राज्यसभेचे 11 आणि इतर 42 आमदारांची संपत्ती जास्त आढळली आहे. त्यांचीही चौकशी प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती सीबीडीटीने न्यायालयात दिली आहे.

COMMENTS