मुंबई – भाजपचे मुलुंडचे आमदार सरदार तारासिंग यांच्या गाडीला रात्री दीडच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुलुंड गोरेगाव लिंक रोडवरुन मुलुंडच्या दिशेने भरधाव वेगाने आलेली गाडी सिग्नलजवळ थेट वाहतूक पोलीस चौकीत घुसली. या अपघातात गाडीचा ड्रायव्हर महेंद्र गुप्ता आणि चौकीत ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्सटेबल गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. अपघात एवढा भीषण होता की गाडीने पोलीस चौकीची भिंत तोडून आत घुसली आणि आतील सामानांचीही मोडतोड झाली आहे. दरम्यान अपघात कसा घडला आणि ड्रायव्हरने मद्यपान केले होते का याचा पोलीस तपास करत आहेत. आमदार सरदार तारासिंग हे रात्री नांदेडला गेले. त्यांना ठाणे स्टेशनवर सोडून परतत असताना हा अपघात झाला.
वाहन चालक महेंद्र गुप्ता यांचावर i p c कलम 279 , 337 , 427 , 429, m v a 184 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या कलमांमफह्ये मोटर वेईकल एकट , वेदरकरपणे गाडी चालविणे , सरकारी मालमत्तेचा नुकसान करणे तसेच निष्काळजी पणे दुसऱ्यांच्या जीवितास धोका पोहचवणे इत्यादीचा समावेश करण्यात आला आहे . तसेच या अपघातात 2 कुत्र्यांचा देखील मृत्यू झाला आहे या कुत्र्यांचे शव पशुवैद्यकीय रुग्णापायात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत . महेंद्र गुप्तांला सायन रुग्णालयात दाखल केल असून त्याने मद्यपान केले होते का हे वैद्यकीय अहवाल आल्यानंतर स्पस्ट होईल.
COMMENTS