अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणात सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे. इक्बाल कासकरला त्याच्या बहिणीच्या म्हणजेच हसिना पारकरच्या घरातून अटक करण्यात आली.
‘इकबाल कासकर याला त्याच्या दोन साथीदारांसह अटक करण्यात आली. 2016 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याला ही अटक झाली असून. घर आणि पैश्याच्या व्यवहारासंबंधी त्याच्यावर गुन्हा दाखल होता. त्याच्यावर इतर काही गुन्हे दाखल आहेत का ? किंवा संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करता येते याची तपासणी करत आहोत. असे गृहराज्य मंत्री रणजित पाटील यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्र सुरक्षा रक्षक यांच्या मागण्या काय आहेत त्याचा विचार केला जाईल. महत्वाच्या ठिकाणी संप सुरू आहे त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. प्राथमिकता लक्षात घेऊन त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. असे रणजीत पाटील म्हणाले आहे.
COMMENTS