माहिम चौपाटीचे सुशोभिकरण करणार – सुभाष देसाई

माहिम चौपाटीचे सुशोभिकरण करणार – सुभाष देसाई

मुंबई : माहिम चौपाटी येथील परिसर केवळ स्वच्छ न करता या परिसराचे सुशोभिकरण करुन एक नवीन चौपाटी मुंबईकरांना मिळणार आहे, अशी माहिती मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

          

स्वच्छ भारत अभियान पंधरवड्यानिमित्ताने माहिम चौपाटी येथे काल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संपदा मेहता, नगरसेवक व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

श्री. देसाई पुढे म्हणाले, माहिम किल्ल्याची डागडुजी, किनारा स्वच्छ करणे तसेच स्थानिक रहिवाशांसाठी स्वच्छता गृहे बांधून देण्यात येतील. यासंदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.

 

COMMENTS