नारायण राणे यांनी रविवारी नव्या पक्षाची घोषणा केली. या पक्षात नितेश राणे यांचा मुलगा सहभागी झाला आहे .पण नितेश राणे मात्र काही या पक्षाचा भाग झालेले नाहीत. यावर नितेश राणेने ट्विट केलं आहे.
“माझ्या मुलाने माझ्याआधी त्याच्या आजोबांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. मी अजूनही प्रतीक्षेतच आहे. जय स्वाभिमान”, असे नितेश राणे यांनी ट्विट केले आहे.
नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केल्यानंतर, आता कार्यकर्त्यांची जमवाजमव करुन पक्षबांधणी सुरु झाली. मात्र या पक्षात एक चिमुकल्या कार्यकर्त्याने प्रवेश केला आहे. तो चिमुकला म्हणजे आमदार नितेश राणेंचा मुलगा होय. नितेश राणे या पक्षात कधी प्रवेश करणार याबाबत मात्र नारायण राणे यांनी काहीही माहिती देणं टाळलं आहे. पत्रकारांनी विचारलं असता ज्योतिषाला विचारून सांगतो असं राणे म्हणाले होतो. तसंच साहेबांची आज्ञा झाली की पक्षात प्रवेश करणार असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं.
My son joins his grandfathers Maharashtra Swabhiman Party before me…I m still in waiting !! Jai Swabhiman!! ✊????✊????✊???? pic.twitter.com/ZNtEpDuvAW
— nitesh rane (@NiteshNRane) October 1, 2017
COMMENTS