“शरद पवार म्हणज्ये राजकारणाचे होकायंत्र, काहींसाठी धोकायंत्र”

“शरद पवार म्हणज्ये राजकारणाचे होकायंत्र, काहींसाठी धोकायंत्र”

पुणे – शरद पवारांच्या राजकारणाचा भल्याभल्यांना अंदाज येत नाही. पवारांचे अगदी जवळचे सहकारीही पवांराच्या राजकारणाबद्दल अगदी ठामपणे सांगू शकत नाहीत. मात्र पवारांना सामान्य माणसांची आणि राजकारणाची नस मात्र चटकण लक्षात येते. हे त्यांचे विरोधकही मान्य करतात. शरद पवार दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागा असाच संदेश देत आहेत.  तसंच जनमत सरकारच्या विरोधात आहे हेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत. यावरुन पत्रकारारांनी काल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना पुण्यात छेडलं असता, पवारांना राजकाराची दिशा चांगली कळते, ते मुरब्बी राजकारणी आहेत असं राऊत म्हणाले. तसंच पवार हे राजकारणाचे होकायंत्र आहेत, तर कांहीसाठी धोकायंत्र आहेत अशी कोटीही संजय राऊत यांनी केली. बघुयात आता पवारांनी सांगितल्या प्रमाणे होतंय का ते .

COMMENTS