काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षपद देण्यासाठी हालचाली सुरू असतानाच आता काँग्रेसमधूनच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर टीकास्त्र सुरू झालंय. ज्येष्ठ काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी अध्यक्षपदावरुन राहुल आणि सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल केलाय. मुलगा किंवा आई यांच्याशिवाय दुसरा कोणी काँग्रेसचा अध्यक्ष होऊ शकत नाही असं ट्विट अय्यर यांनी केलंय. राहुल गांधी यांनी आपण अध्यक्ष होण्यास तयार आहोत असं म्हटलंय. उमेदवार राहुल गांधी हे एकटेच उमेदवार असतील तर निवडणूक कशी होणार असा सवालही मणिशंकर अय्यर यांनी केला आहे.
आधीच काँग्रेसवर विरोधकांकडून त्यातही विशेषतः भाजपकडून घराणेशाहीच्या मुद्द्यावर हल्लाबोल होत असताना आता काँग्रेसमधूनच टीका होऊ लागली आहे. त्यामुळे भाजपच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. काँग्रेसमधून राहुल गांधी यांच्यावर अध्यक्षपद स्विकारावे यासाठी आग्रह होत असताना हा ट्विटर बाँम्ब झाल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. मणिशंकर अय्यर हे गांधी घराण्याचे एकनिष्ठ मानले जातात.
COMMENTS