अहमदाबाद – गुजरात विधानसभेसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरातमध्ये तळच ठोकला आहे. सभा आणि बैठकांचा धडाका लावला आहे. गुजरातमधील छोटा उदयपूर येथील सभेनंतर एक अशी घटना घडली की, त्यानंतर सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरु झाली आहे.
गुजरातमध्ये एका खेड्यात सभेला आले असता ते चुकून लेडीज टॉयलेटमध्ये घुसले. केवळ गुजरातीत लिहिलेली पाटी वाचता न आल्यानं त्यांचा गोंधळ उडाला अन् काँग्रेस नेत्यांनाही हा प्रकार पाहून हसू आवरता आलं नाही.
राहुल गांधी यांनी बुधवारी छोटा उदयपूर गावात सभेला संबोधित केले. त्यानंतर दरबार हॉलमध्ये तरूण कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. या दरम्यान ते टॉयलेटला गेले. पण जेन्टस टॉयलेटमध्ये जाण्याऐवजी ते चुकून लेडीज टॉयलेटमध्ये घुसले. टॉयलेटच्या बाहेर पेपरवर गुजराती भाषेत लेडीज टॉयलेट असं लिहलं होतं. तसंच दरवाज्यावर लेडीज टॉयलेट असल्याचा कोणताही फोटो किंवा चित्रही नव्हतं. त्यांना गुजरातीतला मजकूर समजला नाही. त्यामुळे ते थेट लेडीज टॉयलेटमध्ये घुसले. मात्र एसपीजी जवानांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी राहुल यांना तात्काळ लेडीज टॉयलेटमधून बाहेर काढले. मात्र राहुल लेडीज टॉयलेटमधून बाहेर येत असल्याचं पाहून तेथे उपस्थिती काँग्रेस नेत्यांना हसू आवरता आलं नाही.
COMMENTS