नवी दिल्ली – टीपू सुलतान हे क्रूर हत्यारे होते, अशा व्यक्तीचे उदात्तीकरण करण्यासाठी आयोजित करण्यात येणा-या त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे मला निमंत्रण नको असे पत्र केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटकाचे सचिव आणि इतर उच्च अधिका-यांना लिहिलं आहे. 10 नोव्हेंबरला टीपू सुलतान यांची जयंती आहे.
उत्तर कनाडा मतदारसंघाचे 5 वेळा खासदार राहिलेले अनंतकुमार हेगडे हे टीपू सुलतान यांचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. मात्र ते सध्या केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे प्रोटोकॉलनुसार त्यांना निमंत्रण पत्रिका पाठवली जाते.
दरम्यान कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हेगडे यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. हेगडे हा मुद्दा ध्रुविकरणासाठी वापरत असल्याची टीका कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. प्रोटोकॉलनुसार सर्वच मंत्र्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवण्यात येईल. ज्यांना ते स्विकारायचे आहे ते स्विकारतील ज्यांना ते स्विकारायचे नाही ते स्विकारणार नाहीत अशी भूमिका सिद्धरामय्या यांनी घेतली आहे.
Conveyed #KarnatakaGovt NOT to invite me to shameful event of glorifying a person known as brutal killer, wretched fanatic & mass rapist. pic.twitter.com/CEGjegponl
— Anantkumar Hegde (@AnantkumarH) October 20, 2017
COMMENTS