उत्तर प्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या 

उत्तर प्रदेशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची हत्या 

उत्तरप्रदेशातील गाझियापूरमध्ये राष्ट्रीर स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आणि स्थानिक पत्रकार राजेश मिश्राची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली.हल्लेखोर बाईकवरून आले होते आणि त्यांनी राजेशवर गोळय़ा झाडल्या.या घटनेत राजेशचा भाऊही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

चार दिवसांपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते रविंदर गोसाई यांची हत्या करण्यात आली होत. त्यानंतर आता लगेचच आणखी एका कार्यकर्त्याला लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून केरळ आणि इतर ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे.

 

COMMENTS