शिवप्रेमींच्या भावना दुखावत आहेत, कर्जमाफी योजनेचे नाव बदला, अन्यथा…. मुख्यमंत्र्यांना पत्र !

शिवप्रेमींच्या भावना दुखावत आहेत, कर्जमाफी योजनेचे नाव बदला, अन्यथा…. मुख्यमंत्र्यांना पत्र !

नांदेड – राज्य सरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफी योजनेस शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे. पण कर्जमाफी योजनेत घातलेल्या जाचक अटी आणि योजनेतेली गोंधळामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराजी आहे. या योजनेची सर्वच स्तरातून निषेध केला जातो आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे या योजनेची टिंगल टवाळी केली जात आहे. सरकारच्या मुर्खपणाची टर उडवी जात आहे. या योजनेला असलेल्या शिवाजी महाराजांच्या नावामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखवल्या जात आहेत. त्यामुळे एकतर सरकारने या योजनेचे नाव बदलावे किंवा सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले यांनी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे.

    या पत्रात काय म्हटले आहे ते पाहू ,,,,

महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे सुरू केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना ही पुर्णतः फसवी योजना असून या योजने विषयी सर्वत्र टिंगल टवाळी होत असून खंडीभर निकष असेल्या कर्जमाफी योजनेचा विषय जरी निघाला तरी सर्वत्र शासनाच्या नाकर्तेपणाची मुर्खपणाची चेष्टा होत आहे. त्यामुळे आपण सुरू केलेल्या या योजनेमुळे शेतकर्‍यांची घोर निराशा झाली व फसव्या योजनेला छत्रपतींचे नावे दिल्याने राज्यातील जनतेच्या भावना दुखावत आहेत. त्यामुळे आपणास विनंती करण्यात येते की,आपण एक तर शेतकर्‍यांना पुर्णतः सरसकट कर्जमुक्ती देवून छत्रपतींच्या दिलेले नाव सार्थक ठरवावे किंवा शेतकर्‍यांचा अपमान करणार्‍या व शासनाची निदंा नालस्ती होणार्‍या या योजनेला दिलेले छत्रपतींचे नाव बदलावे. अन्यथा येणार्‍या काळात शेतकरी आपल्या सरकारला माफ करणार नाही.

आपण जर  या योजनेचे नाव बदलले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल. दरम्यान  होणार्‍या सर्व प्रकाराला सरकार जवाबदार राहील याची नोंद घ्यावी.

आपला.

प्रल्हाद रामजी इंगोले

जिल्हाध्यक्ष,

स्वाभिमानी शेतकरी संघटना,नांदेड

९४२१९७२०१३

COMMENTS