राष्ट्रपतींच्या भाषणाने झाली भाजपची गोची !

राष्ट्रपतींच्या भाषणाने झाली भाजपची गोची !

कर्नाटक विधानसभेला 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती रामानाथ कोविंद यांचं भाषण झालं. या भाषणात त्यांनी टिपू सुलतान यांना इंग्रजांशी लढताना वीरमरण आले असे गौरवउद्गार काढले. राष्ट्रपतींच्या या उद्गारामुळे भाजपची मात्र चांगलीच अडचण झाली आहे.

          येत्या 10 नोव्हेंबर रोजी टीप सुलताना यांची जंयती आहे. त्यासाठी कर्नाटक सरकारने कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. मात्र या कार्यक्रमाचं आपल्याला निमंत्रण देऊ नये अशी भूमिका भाजपचे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी घेतली आहे. टीपू सुलतान यांनी नरसंहार केला आहे. महिलांवर अत्याचार केले आहे. अशा व्यक्तीचे उदात्तीकरण नको, त्यामुळे या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्येही आपले नाव टाकू नये अशी भूमिका हेगडे यांनी घेतली आहे. मात्र राष्ट्रपतींच्या या वक्तव्याने हेगडे आणि भाजपची मोठी अडचण झाली आहे. म्हैसुरच्या विकासात टीपू सुलतान यांचं मोठं योगदान आहे असंही राष्ट्रपीत म्हणाले. एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

    याआधी भाजपचे दुसरे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही टीपू सुलतान यांच्यावर टीके केली आहे. आता राष्ट्रपीतंनी अशी भूमिका घेतल्यावर भाजपचे नेते कोणती भूमिका घेतात याकडं सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS