फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा 1 नोव्हेंबरला मूक मोर्चा

फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा 1 नोव्हेंबरला मूक मोर्चा

मुंबई – एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी रेल्वे आणि प्रशासनाकडे केली होती.  मात्र तरीही फेरीवाले न हटल्याने मनसे कार्यकर्ते मुंबईसह उपनगरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावत आहेत. या फेरीवाल्यांवरुन आता राजकारण भडकणार असल्याचं चित्र आहे. कारण काँग्रेसकडून फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे. 

येत्या 1 नोव्हेंबरला काँग्रेस दादरमध्ये मूक मोर्चा काढणार आहे. फेरीवाल्यांना समर्थन देण्यासाठी ‘फेरीवाला सन्मान मार्च’ काढण्यात येईल. दादरमध्ये मराठी फेरीवालेदेखील आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याचं मुंबई काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.

COMMENTS