पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ ऐकण्यासाठी नागरिकांना सामोस्याचं आमिष !

पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ ऐकण्यासाठी नागरिकांना सामोस्याचं आमिष !

नागपूर –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’  कार्यक्रम ऐकण्यासाठी लोकांना एकत्रित करण्याचे आदेश भाजपने नगरसेवकांना दिलेत. त्यामुळे नागपूरमध्ये नगरसेवक लोकांना एकत्रित करण्यासाठी आता सामोसा खाऊ घालणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

शहरातील प्रभागांमध्ये लोकांना एकत्रित करावे, मन की बात कार्यक्रम ऐकवावा, चौकांमध्ये, उद्यानांमध्ये कार्यक्रम आयोजित करावे, व्हॉट्स अॅपवर ग्रुप तयार करावेत असंही सांगण्यात आल्याचं कळतंय. नागपुरात प्रभाग क्रमांक 32 आणि 33 चौकात व्यवस्था करूनही लोक फिरकलेही नाहीत. त्यामुळे ही शक्कल लढवून लोकांना सामोसा देण्याचं आमीष दाखवण्यात येत असल्याचं दिसतंय.

 

COMMENTS