मुंबईतील वाहतूक कोंडीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुचवले उपाय !

मुंबईतील वाहतूक कोंडीवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सुचवले उपाय !

मुंबईमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून प्रवास करणाऱ्या ला वाहतूक कोंडीचा सामना करत प्रवास करावा लागतो. याकरिता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हाँगकाँगसारखी जलवाहतूक सेवा मुंबईतही सुरू करावी असे पत्र जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा यांना देऊन वाहतूक कोंडीवर उपाय सुचवला आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिजन २०२५ ची घोषणा केली आहे. त्यानुसार, सचिनने शहरातील सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. व्हिजन-२०२५ ही प्रकल्प योजना ठेवून शहरात नो पार्किंग झोनची संख्या वाढवावी पाचदारी पूल आणि रेल्वे स्थानकांवरील फलाट रुंद करण्यात यावेत अशा सूचना त्याने दीपेंद्र सिंह कुशवाहा यांना पत्राद्वारे पाठविल्या. तसेच हाँगकाँगप्रमाणेच मुंबईतही जलवाहतुकीला चालना द्यावी. ही सेवा शहरातील इतर भागांना जोडल्यास रस्ते आणि रेल्वेसेवेवरील ताण कमी होऊ शकतो.

मुंबईत फुटपाथवरील फेरीवाल्यांची समस्या गंभीर आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठी स्वतंत्र जागा देण्यात यावी रेल्वे स्टेशनपासून काही ठराविक अंतरावर असे झोन तयार केले जावेत. तसेच फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र आठवडा बाजार रेल्वे प्रवाशांसाठी स्वतंत्र स्कायवॉक मार्ग बांधण्यात यावेत. ज्याचा फायदा रेल्वे प्रवाशांना होईल. शहरात ग्रीन झोन तयार करावेत अशी मागणी सचिन तेंडुलकरने जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा यांना पत्राद्वारे केली आहे…..

COMMENTS