फेरीवाला आंदोलन प्रकरणी राज ठाकरे आज मांडणार भूमिका

फेरीवाला आंदोलन प्रकरणी राज ठाकरे आज मांडणार भूमिका

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेनं सुरु केलेल्या आंदोलनानंतर आज पहिल्यांदा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांची भूमिका मांडणार आहेत. आज सायंकाळी 6:30 वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजीत करण्यात आला आहे.

एल्फिस्टन रोड रेल्वे पुलावर झालेली दुर्घटना, त्यानंतर चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या प्रशासकीय कार्यालयावर काढलेला मनसेने काढलेला संताप मोर्चा, रेल्वे हद्दीतील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचा रेल्वे प्रशासनाला दिलेला अल्टीमेटम, फेरीवाल्यांविरोधात आंदोलनाचे हिंसक पडसाद, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत झालेला मनसे कार्यकर्त्यांचा संघर्ष, मालाड येथे फेरीवाल्यांकडून मनसे कार्यकर्त्यांना झालेली मारहाण आणि दादर रेल्वे स्टेशन बाहेर फेरीवाला समर्थनार्थ मुंबई काँग्रेसने काढलेल्या मोर्चावर मनसेने केलेला हल्ला हा सर्व घटनाक्रम ताजा आहे. त्यापार्श्वभूमीवर ठाकरे आज पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात  आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट करतील. सायंकाळी 6:30 वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पक्षाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजिय करण्यात आला आहे. त्यामध्ये राज ठाकरे पदाधिकारी-कार्यकर्त्याना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या कायकर्त्यांच्या पाठीवर राज ठाकरे यांच्याकडून शाबासकीची थापही पडणार आहे. त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका मांडतात या घटनेकडे सर्वांचे लक्ष असेल.

COMMENTS