येत्या 8 नोव्हेंबरला ‘व्हाईट मनी डे’ साजरा करणार – आठवले

येत्या 8 नोव्हेंबरला ‘व्हाईट मनी डे’ साजरा करणार – आठवले

मुंबई – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा रोखण्यासाठी केलेल्या नोट बंदीला येत्या 8 नोव्हेंबर रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे.  या क्रांतिकारक निर्णयाच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभर व्हाईट मनी डे साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

नोटबंदी च्या वर्षपूर्तीनिमित्त 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता दादर येथील चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून नोट बंदीच्या समर्थनार्थ व्हाईट मनी डे साजरा करण्यात येणार आहे. नोटबंदीच्या वर्षपूर्ती स्वागत उत्सव सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अभिनंदन करण्यात येणार आहे. या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात रिपाइंच्या वतीने नोट बंदीच्या समर्थनासाठी व्हाईट मनी डे साजरा होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात महामानव डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ नोट बंदीच्या समर्थनासाठी पंतप्रधानांच्या अभिनंदनासाठी व्हाईट मनी डे साजरा करण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितलं आहे.

 

COMMENTS