मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्त भेट घेतली आहे. 10 दिवसांपूर्वी घेतलेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील राजकारणातील सद्यस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच सत्तेत राहायचे की नाही याबाबत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी विचारविमर्श केल्याचं वृत्त आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली. या भेटीमध्ये ठाकरे यांनी भाजपा सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नसल्याचे दिसत असल्याचे शरद पवार यांनी म्हटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपाचे अनेक नेते नारायण राणे यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यास इच्छुक आहेत. राणेंना मंत्रिमंडळात घेऊन शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे.
COMMENTS